breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

रेमडेसिविर मिळत नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील कोरोनाबााधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्याला रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्यानं रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर उतरले आहेत. नातेवाईकांनी बंडगार्डन चौक अडवला असून ते आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आले. रेमडेसिविर मिळत नसल्यानं नातेवाईक हतबल झाले असून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.

सरकार, प्रशासनाकडून रेमडेसिविरचा पुरवठा होत असल्यानं रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी आज सकाळी बंडगार्डन चौकात ठिय्या दिला. काळ्या बाजारात इंजेक्शन मिळत असल्याची तक्रार यापैकी अनेकांनी केली. नातेवाईकाला इंजेक्शन नाही तर मृत्यूचा दाखला घ्यायचा का?, असा सवाल आंदोलन करत असलेल्या गीता गोयल यांनी उपस्थित केला. गीता यांचे पती सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आमच्यासमोर इतरांना इंजेक्शन देतात. पण आम्हाला देत नाहीत. मी गेल्या ४ दिवसांपासून सगळीकडे फिरतेय. पण इंजेक्शन मिळालेलं नाही. सरकार आमच्या मृत्यूची वाट बघतंय का?, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्याच्या तुलनेत गेले दोन दिवस पुणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा ब-यापैकी पुरवठा होत असताना बुधवारी सायंकाळपर्यंत मात्र पुण्यासाठी एकही रेमडेसिविर इंजेक्शन पुरवठा झाला नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी होत असल्याने व अनेक हॉस्पिटलकडून तुमच्या पेशंटला दोन तासात रेमडेसिविर उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही जबाबदारी घेणार नाही असे वारंवार सांगितले जात असल्याने बुधवारी दिवसभर रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड वणवण करावी लागली.

पुणे शहर आणि जिल्ह्यात सोमवार,मंगळवार या दोन दिवसांत १२ हजार ७९७ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. परंतु दररोज रुग्णसंख्या वाढतच असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनची मागणीदेखील वाढतच आहे. सध्या अनेक खाजगी हॉस्पिटलकडून गरजेपेक्षा अधिक रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर अधिक केला जात असून यावर जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button