breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

दिलासादायक : पुणे जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट गावांची संख्या झाली कमी!

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची माहिती

पुणे । प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या गावांची संख्या आता १०९ वरुन ९५ इतकी कमी झाली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत तसंच ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनांबाबत यावेळी माहिती घेतली.

जिल्ह्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे. खाजगी रुग्णालय लसीकरणावरही शासनाचं नियंत्रण आहे. तसंच खाजगी रुग्णालयाच्या वैद्यकीय देयकांचे लेखा परिक्षणही वेळोवेळी सुरु आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही, असेही पवार यांनी सांगितले.

शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय अद्याप नाहीच…

सुपर स्प्रेडर सर्वेक्षण नमुना तपासणीमध्ये एम.आय.डी.सी. कारखाने क्षेत्रातील कामगार व मजूर, बँक कर्मचारी तसंच सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आरटीपीसीआर नमुना तपासणी करण्यात येत आहे. धडक सर्वेक्षण मोहिमेमुळे हॉटस्पॉट गावांची संख्या १०९ वरुन ९५ पर्यंत कमी झाली आहे. ग्रामीण भागातील हॉटस्पॉट गावांवरही विशेष लक्ष देण्यात येत आहे. शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सचे तज्ञ जे मार्गदर्शन देतील त्यानुसारच निर्णय घेण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button