breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

रिझर्व्ह बँकेकडून नियम मोडणाऱ्या ८ बँकांवर दंडाची कारवाई

 

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

केवायसी, कर्ज आणि त्यासंबंधीच्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने देशभरातील ८ नागरी सहकारी बँकांवर दंडाच्या कारवाईचा बडगा उगारला. त्यात या बँकांना १ ते ४ लाखांपर्यंत दंड ठोठावला आहे. मुंबईतील मोगवीरा सहकारी, वसई जनता आणि भंडारी कॉपरेटिव्ह बँक यांचाही त्यात समावेश आहे.

गुजरातमधील सूरतच्या दि असोसिएट को-ऑपरेटिव्ह बँकेने संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देताना केवायसी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने या बँकेला ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. सूरतमधीलच दि वराच्छा को-ऑपरेटिव्ह बँकेलाही १ लाखाचा दंड ठोठावला आहे. या बँकेने ठेवीदारांची जनजागृती करण्याच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. मुंबईतील मोगवीरा को-ऑपरेटिव्ह बँकेला ग्राहकांच्या केवायसी नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी २ लाखांचा दंड ठोठावला आहे. वसई जनता सहकारी बँकेलाही आरबीआयने २ लाखांचा दंड ठोठावला आहे. या बँकेने संचालकांसंदर्भातल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. राजकोट बँकेला १ लाख आणि भंडारी को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला २ लाखांचा दंड केला आहे. जम्मू सेंट्रल को-ऑपरेटिव्ह आणि जोधपूर नागरिक सहकारी बँक यांना प्रत्येकी १ लाखाचा दंड केला आहे. आरबीआयने एकाच दिवशी एवढ्या बँकांवर केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button