TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

उच्च रक्तदाब मध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, जाणून घ्या याचे फायदे

उच्च रक्तदाब हा ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. अनियंत्रित रक्तदाब धोकादायक असू शकतो कारण त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होऊ शकतो. बैठी स्वरुपाची कामे आणि रक्तदाब वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन हे दोन घटक आपली जीवनशैली रक्तदाब वाढण्याची मुख्य कारणे ठरू शकतात. यावर उपाय म्हणून लसाणाचा वापर केला जातो. लसणामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. 

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे तुम्ही ऐकले असेल. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य रक्तदाब 120/80 mmHg इतका असतो. यापेक्षा जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. तसेच एलिसिन नावाच्या सेंद्रिय संयुगामुळे अनेक वैद्यकीय परिस्थितींवर उपचार करण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. लसूण तुमच्या तोंडात तिखट चव सोडण्याशिवाय तुमचा रक्तदाब प्रभावीपणे कमी करू शकतो.   

खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात लसणाचा वापर हमखास केला जातो. प्रत्येक स्वयंपाक घरात दररोज वापरला जाणारा लसूण आरोग्यासाठीही गुणकारी आहे हे अनेकांना माहित नसते. लसणामध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात, ज्यामुळे अनेक आजारांवर हे औषध मानले जाते. लसणामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. तसेच हे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

दररोज सकाळी नियमितपणे कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लसूण खाणे फायदेशीर ठरू शकते.
लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. 
लसणामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी गुणधर्म आढळतात, जे इन्फेकशनपासून सुरक्षा करण्यास फायदेशीर मानले जातात.
जेवणामध्ये जंक फूडचा भडीमार, त्यामुळे वाढणारे वजन यांमुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढतो. 
आरोग्याबाबत गंभीर समस्या उद्भवू शकतात त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. यासाठी लसूण फायदेशीर मानले जाते. यासह लसणामुळे मेटाबॉलिजम सुधारण्यास मदत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button