TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्रींना दुय्यम स्थान, माधुरी दीक्षितबद्दल रवीनानं केलं धक्कादायक वक्तव्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना ही नेहमीच सोशल मीडियावर तिचं मत मांडताना दिसते. रवीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच रवीनानं महिला कलाकार आणि पुरुष कलाकारांमध्ये भेदभावावर प्रश्न उपस्थित केला. महिलांना वेगळ्या यादीत ठेवले जाते आणि पुरुष हे नेहमीच सुपरस्टाडम एन्जॉय करतात. 

‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2022’ दरम्यान एका संभाषणात रवीना टंडनने बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींना मिळणाऱ्या वेग-वेगळ्या वागणुकीबद्दल सांगितले. यावेळी रवीना म्हणाली, ‘मी मीडियालाही विचारायचे की ते अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये फरक का करतात. आमिर जेव्हा 2-3 वर्षांचा ब्रेक घेतो आणि एक नवीन चित्रपट घेऊन परततो, तेव्हा त्याला तुम्ही कमबॅक नाही म्हणतं. 90 च्या दशकातील सुपरस्टार आमिर खाननं कमबॅक केलं आहे असे तुम्ही म्हणत नाही. आम्हीही सतत काम करत आहोत. पण मी मीडियामध्ये 90 च्या दशकातील सुपरस्टार माधुरी दीक्षित विषयी बरेच आर्टिकल पाहिले आहेत. ती न थांबता काम करते , मग तुम्ही तिला कमबॅक हे लेबल कसं देता? सलमान खान किंवा संजय दत्तबद्दल तुम्ही असं कधीच बोलत नाहीत, म्हणूनच असमानतेला संपवण्याची गरज आहे. 

जेव्हा रवीनाला ओटीटीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, ‘माझ्या मते, ओटीटी हे मनोरंजनाचेही एक माध्यम आहे. आम्ही कॅमेरासाठी.. प्रेक्षकांसाठी परफॉर्म करतो. ओटीटीवर अशी काही तुलना नसते की कोणाचा काय वय आहे, त्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारचे स्टारडम आणि कॉन्टेंट आहे. ती म्हणाली की, इथे फक्त एक चांगली कथा किती चांगली आहे आणि ती किती चांगल्या प्रकारे दाखवण्यात आली आहे हे महत्त्वाचं असतं. याला काही महत्त्व नसतं की कोणत्या शोनं किती बिझनेस केला आहे. तुम्हाला सीक्स पॅक अॅब्स आहेत की नाही यानं काही फरक पडत नाही. ‘अर्थात सिनेमाचीही त्याची गरज आहे. 30 सेकंदांनंतर ते विसरतात आणि चांगली कथा शोधताच. मला वाटतं OTT वर वय, दिसणं काही फरक पडत नाही. 

दरम्यान, रवीना टंडन सगळ्यात शेवटी दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट KGF 2 मध्ये दिसली होती. रवीनानं तिच्या चित्रपटाच्या यशाचे श्रेय हे ओटीटीला दिले. ती म्हणाली की, ‘जेव्हा KGF रिलीज झाला तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. तर OTT वर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा या चित्रपटाने त्यातही चांगली कमाई केली. अशा परिस्थितीत जेव्हा KGF 2 ची चर्चा झाली.. तेव्हा लोक KGF 2 मध्ये काय होईल हे जाणून घेण्यासाठी OTT वर KGF 1 पाहण्याची प्रतिक्षा करत होते. त्यामुळे OTT नं KGF 2 ला मोठा करण्यात मदत केली.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button