breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

राऊतांनी भाजपामध्ये बाहेरुन आलेल्यांची बांगलादेशींशी केली तुलना, म्हणाले…

मुंबई |

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधलाय. भाजपामध्ये बाहेर आलेल्या लोकांनी उच्छाद मांडलाय अशा शब्दांमध्ये राऊतांनी राणेंना टोला लगावला आहे. तसेच संजय राऊत यांनी भाजपामधील खरे मंत्री कधीच शिवसेना भवनावर दगड मारण्याची भाषा करणार नाही असं म्हणत भाजपामध्ये नव्याने प्रवेश केलेलेल्या नेत्यांवर टीका केलीय. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी नारायण राणेंनी महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही असं म्हणून पश्चिम बंगालचा अपमान केल्याचं मत व्यक्त केलं. असं वक्तव्य करुन राणे यांनी पश्चिम बंगालचा आणि महाराष्ट्राचा अपमान केलाय. आधी इतिहास वाचावा आणि मग वक्तव्य करावीत. पश्चिम बंगालमधील अनेकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचं योगदान दिल्याचं सांगत राऊत यांनी राजा राममोहन रॉय यांच्यापासून अगदी ममता बॅनर्जींपर्यंतचे संदर्भ दिले. बांग्लादेशींचा भारतात जसा उच्छाद अशतो तसाच घुसखोरांचा भाजपात उच्छाद असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.

बाहेरुन आलेल्या लोकांनी शिवसेना भाजपामधील संबंध बिघडवल्याची टीकाही राऊत यांनी केलीय. यापूर्वी कधीच शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आले नव्हते. मात्र बाहेरुन आलेल्यांना दोन पक्षांमध्ये संघर्ष हवा असल्याने अशी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी केली. बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी, बाळासाहेब आणि अडवाणी यांचे संबंध कसे होते तसेच बाळासाहेब, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदींसोबत कसे संबंध आहेत हे आम्हाला माहितीय. मात्र ज्यांना हे माहिती नाहीय तेच लोकं चिखलफेक करत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय.

तसेच राऊत यांनी ईडी आणि सीबीआयसारख्या संस्था या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड पश्चिम बंगालमध्ये वेगाने काम करत असल्याचाही टोला लगावला. इतर राज्यांमध्ये काही घडत नाही अशी गोष्ट नाहीय तिथे आमच्यापेक्षा भयंकर गोष्टी घडतात पण या संस्था कोणाच्या मागे लागतात तर महाराष्ट्रातील अनिल देशमुख असो किंवा आमचे सहकारी सरनाईक यांच्या, असं म्हणत राऊतांनी केंद्रीय संस्थांवर टीका केली. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, माझ्याकडे १०० नावं तयार आहेत मी देतो यादी कोणाला नोटीसा पाठवायच्या याची असं म्हणत ईडीचे प्रमुख अधिकारी भाजपामध्ये सहभागी होतात. तुम्ही इडीत बसून भाजपाच चालवत होता ना?, असा टोलाही लगावला. आम्ही टीका करतो आणि सहनही करतो. टीकेला धार असली तरी ती स्वीकारतो. पण कंबरेखालचे वार कराल तर कंबरेखाली तुम्ही सुद्धा आहात हे लक्षात ठेवा. भाषेची बरोबरी करु नका, असा इशारा राऊत यांनी राणेंना दिलाय. तसेच भाजपाने मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्यदिन कितवा होता हे लक्षात रहावं म्हणून ७५ हजार पत्र पाठवण्याचा निर्णय घेतल्यासंदर्भात बोलताना, ७५ हजार पत्रांचा आम्हाला काही फरक पडत नाही, असं राऊत म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button