breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus:कोरोनामुक्त गोव्यात पुन्हा 18 नवे रुग्ण

गोवा : कोरोनामुक्त गोव्यात पुन्हा कोरोनाने एन्ट्री घेतली आहे. गोव्यात 18 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गोव्यात आढळेल्या नव्या रुग्णांमध्ये ट्रेनमधून प्रवास करणारे काही प्रवासी असल्याचं  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. त्यामुळे मजुरांना घेऊन जाणारी दिल्ली-थिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस राज्यात न थांबवण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतला. कोरोनामुक्त असलेल्या गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.

“सध्या राज्यात कोरोनाचे 18 रुग्ण आहेत. हे सर्व रुग्ण राज्यात प्रवेश करत इतर लोकांमध्ये जाण्यापूर्वीच सापडले आहेत”, असं प्रमोद सावंत यांनी सांगितलं.

रविवारी 368 प्रवासी गोव्यात पोहोचले असल्याचं सावंत यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी थिरुअनंतपुरम ते दिल्लीदरम्यान धावणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस मात्र मडगाव रेल्वे स्थानकावर थांबेल असं त्यांनी सांगितलं आहे.

“निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील एकही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नसल्याचं समोर आलं आहे. सोबतच मडगाव रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्याही फार कमी आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली असून रेड झोनमधून येणाऱ्या सर्व ट्रक चालकांची तपासणी केला जाणार असल्याचंही प्रमोद सावंत यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button