पिंपरी / चिंचवड

महिलेवर बलात्कार करून तिच्यासह नातेवाईक आणि मैत्रिणीची 35 लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला. महिलेकडून, तिच्या नातेवाईक आणि मैत्रिणीकडून 35 लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हा प्रकार सन 2017 पासून 30 जानेवारी 2022 या कालावधीत डांगे चौक वाकड, चिंचवडेनगर चिंचवड, साई दर्शन लॉज काळाखडक वाकड येथे घडला.

जावेद सरवर शेख (वय 25, रा. बुचडेवस्ती, मारुंजी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख याने फिर्यादी महिलेला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. महिलेला कुटुंबाची भीती घालून तिच्यावर वारंवार जबरी संभोग केला. फिर्यादी महिला, तिचे नातेवाईक आणि मैत्रिणीकडून आरोपीने 35 लाख रुपये घेतले. घेतलेले पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. तसेच  सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button