breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चुकीच्या कामांची कायदेशीर मार्गाने चौकशी – जयंत पाटील

पिंपरी | प्रतिनिधी 
पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोगस बँक गँरटीसह भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे झाली आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या अनेक गोष्टी हळूहळू लोकांच्या पुढे येतील. आम्ही मुद्दामहून कोणाला अडचणीत आणणार नाही. सूड उगवणार नाही. सुडाचे राजकारण करणार नाही. महापालिकेतील चुकीच्या कामांची कायदेशीर मार्गाने चौकशी होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आली. मोशीतील गणेश बॅक्वेट हॉल येथे पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख आदी उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह, जोष आहे. येणा-या निवडणुकीत महापालिका 100 टक्के राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराची होईल, याची मला खात्री आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे कामकाज होईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत”.

”महापालिका निवडणुकीसाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्यास, महाविकासआघाडी करण्यास राष्ट्रवादीचे प्राधान्य आहे. तीनही पक्षातील स्थानिक पदाधिका-यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करावा. घटक पक्षांकडून अवास्तव मागण्या आल्या. तर, आघाडी व्हायला अडचण होईल. पण, त्याला आणखी वेळ असल्याचे” पाटील यांनी सांगितले. परिसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत आहोत. त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले जात असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्याविरोधात मोठा मोर्चा काढला. या मोर्च्यामुळे सत्ताधा-यांची झोप उडाली आहे. आता त्यांना झोप लागू देऊ नका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button