breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवार थोडे दिवस नसते आले तर..’; शिंदे गटाकडून भाजपाला घरचा आहेर

मुंबई | शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन बुधवारी पार पडला. या वर्धापन दिनाचे दोन मेळावेल झाले. वरळीतल्या डोम सभागृहात शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, याच मेळाव्यात रामदास कदम यांनी देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर दिला आहे. तोदेखील अजित पवारांच्या महायुतीत येण्यावरून.

अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर रहावं लागलं. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चाललं असतं, असं रामदास कदम फडणवीसांना उद्देशून म्हणाले. आता यावर देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा     –      ‘मोदींच्या गॅरंटीवर लोकांचा विश्वास राहिला नाही’; शरद पवारांचा हल्लाबोल 

रामदास कदम यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंवरही टीका केली. शिवसेना ही उद्धव ठाकरेंना त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाटते आणि शिवसैनिक त्यांचा गुलाम आहे असं वाटतं असं रामदास कदम म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला. तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखलं. आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता. हे आपण निवडणुकीमध्ये पाहिलं. जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी देतो. आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…. आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button