breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणास्थान’; काशिनाथ नखाते

कष्टकरी कामगारांकडून राजमाता जिजाऊंना विनम्र अभिवादन.

पिंपरी : राजमाता जिजाऊ या कणखर,निर्भीड, हिम्मतवान तसेच पराक्रमी होत्या . जिजाऊ यांनी बालपणीच युद्ध कलेचे शिक्षण घेतले आणि पुढे त्यांच्या संकल्पनेतूनच स्वराज्याची स्थापना झाली रयतेचे राज्य, स्वराज्याच्या प्रेरणास्थान या राजमाता जिजाऊ होत असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

स्वराज्य संस्थापिका, राजमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कार्यालयामध्ये
असंघटित कामगार, कष्टकरी वर्गाकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजेश माने, संतोष चव्हाण, माधुरी जलमूलवार,बालाजी बिराजदार,अरुणा वाकचौरे,ओमप्रकाश मोरया, स्नेहा वाघचौरे, अश्विनी कळमकर, विशाल सगळे,कोमल कांबळे,कविता सोनवणे, शत्रुघ्न पात्रे, सुनिल मोटे
उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ यांना अन्यायाची नेहमीच चीड होती आणि न्यायाबद्दल चाड होती. आपल्या राज्यातील गरिबांप्रती त्यांना कऋणा होती त्यांच्यावरील अन्याय त्यानां सहन होत नसे, राज्यातील सर्व स्त्रियांचे आणी मुलांचे रक्षण झाले पाहिजे याचा आदर्श जिजाऊने घालून दिला. राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय करणारा मोकळा सुटणार नाही याची दक्षता त्यांनी नेहमी घेतली. आपले राज्य नितीमूल्याची जोपासना करणारे असावे हा त्यांचा पगडा नेहमीच राहिला. जिजाऊने मावळ्यावरती उत्तम विचारांचे संस्कार घडविले नितिमुल्यांची जोपासना त्यांच्याकडून केली . शिवाजीराजे आग्रा येथे कैदेत असताना जिजाऊने स्वराज्याचे नेतृत्व धाडसीपणाने केले त्या कालावधीत स्वराज्यातील किंचीत जमीनही शत्रुना जिंकू दिली नाही, अशा हिम्मतवान,कर्तुत्वान पराक्रमी राजमातेस आम्ही सर्वजण मानाचा मुजरा करीत आहोत असे मत नखाते यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button