breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज ठाकरेंची आजची सभा भाजप पुरस्कृत, ईडीची पिडा टाळण्यासाठी खटाटोप, धनंजय मुंडेंची टीका

परभणी |

 “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजची सभा भाजप पुरस्कृत आहे. ईडीची पिडा टाळण्यासाठी राज ठाकरे सभा घेऊन भाजपला खूश करत आहेत. आधी ते केंद्राविरोधात सभा घ्यायचे. आता ते महाविकास आघाडीविरोधात सभा घेत आहेत. त्याने काहीही फरक पडणार नाही. स्वत:चं काहीतरी झाकण्यासाठी अशा सभांचं आयोजन केलं जातंय”, अशी बोचरी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

महाराष्ट्रदिनी राज ठाकरे यांची औरंगाबादेत भव्य सभा होत आहे. गुडी पाडवा मेळाव्यातून आणि ठाण्याच्या उत्तर सभेतून राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर शरसंधान साधलं. ठाकरे सरकारच्या दोन वर्षाच्या कारभाराचे त्यांनी वाभाडे काढले. तसंच कट्टर हिंदुत्वाची शाल पांघरल्यानंतर भोंगे, हनुमान चालिसेवर जोर देत येणाऱ्या काळातील राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. आज महाराष्ट्रदिनी औरंगाबादेत पुन्हा एकदा राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. तत्पूर्वी राज ठाकरेंच्या सभेआधी राज्यातील सत्ताधारी राज यांच्यावर टीका करत आहेत.

“राज ठाकरेंची आजची सभा म्हणजे स्वत:चं काहीतरी झाकण्यासाठी आहे. आधी ते केंद्राविरोधात बोलायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना देशाच्या राजकीय पटलावरुन हटवलं पाहिजे, अशी मागणी करणारा माणूस आज त्यांचंच गुणगाण गातोय. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. राज ठाकरे यांची आजची सभा ही भाजप पुरस्कृत आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

  • राज ठाकरेंची औरंगााबादेत सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी औरंगाबादेत जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी साडे सात वाजता राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होईल. या सभेला मनसेचे सगळे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाथ जाधव, वसंत मोरे यांच्यासह सगळे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

राज कालच औरंगाबादेत पोहोचले आहेत. सध्या ते रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आहेत. संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ते हॉटेलमधून बाहेर पडतील. सात वाजण्याच्या सभास्थळी पोहोचतील. सभेला ३० हजारांहून अधिक लोक जमण्याची शक्यता व्यक्त केली जातीय. मनसे कार्यकर्त्यांनी सभेसाठी मोठी तयारी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button