breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

२०२४ला पंतप्रधानपदी कोणता नेता असावा? राज ठाकरे म्हणाले..

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाने कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी याचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांना २०२४ला पंतप्रधानपदी कोण असावे असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, मागच्या काही महिन्यांपासून मनसेचे पदाधिकारी अनेक मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. कोणत्या मतदारसंघात नवडणूक लढवावी आणि कुठे लढवू नये, याचा आढावा घेतला जात आहे. ज्याच्या हातात केंद्र आणि राज्याची सत्ता आहे, तेही अशाप्रकारची चाचपणी करतात. मग आम्ही केली तरी काय हरकत आहे.

हेही वाचा   –    ‘शरद पवारांना लोक जाणता राजा म्हणतात, पण..’; शर्मिला ठाकरेंचं विधान 

पंतप्रधानपदी कोणता नेता असावा? असा सवाल राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, २०१४ साली मी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला नव्हता. त्यांच्यासारखा व्यक्ती पंतप्रधानपदावर असावा, अशी फक्त इच्छा व्यक्त केली होती. यावेळी तसा काही विचार केलेला नाही. पंतप्रधानपदी कोण असावा? याची चाचपणी सुरू आहे. माझी चाचपणी झाली की सांगेन, असं राज ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत राज ठाकरे म्हणाले की, त्यांच्या आघाडीचे काहीही भवितव्य नाही. नितीश कुमार यांच्याच आघाडीत होते. त्यांचे काय झालं? असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर त्यांनी एक व्यंगचित्र दाखवले. या व्यंगचित्रात दोन आय काढून टाकला होता. त्यामुळे त्यात फक्त एनडीए उरले होते.

मराठी शाळा सेमी इंग्रजी केल्याशिवाय त्या चालणार नाहीत. प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला इंग्रजी यावे, असं साहजिकच वाटतं. हा वैयक्तिक प्रश्न असल्यामुळे त्याला सामाजिक दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही. ज्यांनी सेमी इंग्रजी शाळा केल्या तेथील पटसंख्या शंभर टक्के आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button