breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

टोलनाक्याची तोडफोड केल्याच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांचं वाहन रोखल्यामुळे समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची तोडफोड केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली. यानंतर भाजपाने मनसेवर टीका करायला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सनेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या कृतीचं समर्थन केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, अमित सध्या महाराष्ट्राभर दौरा करतोय. तो काही टोलनाके फोडत चालला आहे असं काही नाहीये. एका टोलनाक्यावर हा प्रसंग घडला. त्या टोलनाक्यावर अमितची गाडी बराच वेळ उभी होती. त्याच्या कारवर फास्टॅगही होता. तरीदेखील त्याला थांबवून ठेवलं होतं.

हेही वाचा – Pune : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तो त्यांना सांगत होता की, मी टोल भरला आहे, तरी त्याला थांबवलं. मग ही फोडाफोडी झाली. त्यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याचा वॉकीटॉकी सुरू होता आणि समोरचा माणूस त्यावरून उद्धटपणे बोलत होता. त्यावर आलेली ह मनसैनिकांची प्रतिक्रिया आहे. अमित महाराष्ट्रभर टोल फोडत सुटलेला नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

भाजपाने टीका करण्यापेक्षा त्यांनी निवडणुकीआधी जी टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती, त्याचं काय झालं? ते सांगावं. हे जे टोलनाके आहेत ते म्हैस्कर नावाच्या माणसाला मिळतात, हा कोण लाडका आहे? हा कोणाचा लाडका आहे? यावरही त्यांनी बोलावं, असंही राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button