Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत पावसाचे धुमशान; मुंबईत पाऊस सक्रिय झाल्यापासून वाहतुकीचा वेग मंदावला

मुंबईः मुंबईत पाऊस सक्रिय झाल्यापासून वाहतुकीचा वेग मंदावला आहे. पाऊस, सखल भागांत साचलेले पाणी आणि महत्त्वाचे म्हणजे खड्ड्यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांच्या वतीने यंदा प्रथमच खड्ड्यांचेही ॲलर्ट दिले जात आहेत. इतकेच नाही तर वाहतूक कोंडी टाळली जावी, अपघात होऊ नयेत यासाठी ज्या ठिकाणी खड्डा असेल त्याचा फोटो, माहिती पालिका, एमएमआरडीए यांना पाठवून तो खड्डा बुजविण्याचे कामही वाहतूक पोलिस करीत आहेत.

मुंबईकरांना वाहतूक कोंडी तशी नेहमीचीच आहे. मात्र पावसामुळे या कोंडीमध्ये आणखी भर पडली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसामुळे खड्डे वाढत आहेत व सखल भागांत पाणीही साचत आहे. याचा परिणाम वाहतुकीच्या वेगावर होत असून, पूर्व आणि पश्चिम या दोन महामार्गांबरोबरच मुंबईच्या गल्लीबोळातील रस्त्यांवरही वाहतूक संथगतीने सुरू आहे. अपघात, वाहने बंद पडणे, पालिकेचे किंवा मेट्रोचे काम तसेच इतर कारणांबरोबरच खड्ड्यांमुळेही वाहतुकीचा वेग मंदावत आहे. वाहतुकीचे नियमन करणारे पोलिस खड्ड्यांचे फोटो, ठिकाण आणि त्यामुळे होणारी कोंडी याची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतात. वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी ही माहिती संबंधित यंत्रणांना पाठवून त्यांच्याकडे पाठपुरावा करून हे खड्डे बुजवून घेत आहेत.

मुंबईतील वाहतूक कोंडीची कारणे वेगवेगळी आहेत. ट्विटर तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून आम्ही ही कारणे, संथगतीने वाहतूक सुरू असल्याची ठिकाणे यांची माहिती मुंबईकरांना देत असतो. कुठे खड्डे पडले असतील, पाणी साचले असेल किंवा अन्य काही समस्या असल्यास कर्तव्यावरील पोलिस मुख्य नियंत्रण कक्षाला कळवितात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही माहिती संबंधित प्रशासनाला कळविली जाते. – राज तिलक रौशन, पोलिस उपायुक्त, वाहतूक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button