breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

आमदार महेश लांडगे आता गावगाडाही यशस्वीपणे हाकताहेत!

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक मधु जोशी यांचे गौरवोद्गार

पिंपरी-चिंचवड शहर भाजपातर्फे आमदार लांडगे यांचा सन्मान

पिंपरी । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आमदार महेश लांडगे यांनी सुरूवातीला बैलगाडा शर्यतीचा लढा जिंकला आणि आता गावगाडा म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लावत गावगाडाही यशस्वीपणे हाकत आहेत. आमदार लांडगे यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी स्थानिक नेतृत्वाचा आशेचा किरण दिसत आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक मधु जोशी यांनी काढले.
हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी-चिंचवडमधील ४२ वर्षे प्रलंबित प्राधिकरण बांधितांच्या साडेबारा टक्के परतावा, १४ वर्षे प्रलंबित शास्तीकर पूर्णमाफी आणि सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी पुण्यात धोरणात्मक बैठक घेण्याबाबतचे महत्त्वूपर्ण निर्णय झाले. यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे सभागृहात मांडली. याबद्दल शहर भाजपाच्या वतीने आमदार लांडगे यांचा नागरी सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, कैलास कुटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी राहुल जाधव, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, कैलास कुटे, सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे यांनी मनोगत व्यक्त केले.

मधू जोशी म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मांडले. आधी बैलगाडा आता गावगडा लाईणीवर लावत आहेत. मला आठवतंय पिंपरी चिंचवड शहराला उपऱ्या नेतृत्वाचे शहर म्हणले जात होते. या शहराला कुठल्याच पक्षाचा नेता नव्हता. या सर्व पक्षांचे कार्यकर्ते खुप निष्टावंत होते. पण यांना सर्वांना बांधुन ठेवेल असे नेतृत्व नव्हते. म्हणुन आम्ही नेहमी म्हणायचो हे शहर उपऱ्या नेतृत्वाने शापित झाले आहे. येथे स्थानिक नेतृत्व नव्हते. ती एक खंत होती. ती आता दूर होत आहे. मला महेश लांडगे यांच्या रुपाने तो किरण दिसतोय.

आमदार उमा खापरे म्हणाल्या की, शास्तीकराच्या ओझ्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिक वैतागले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार लांडगे यांचे कौतूक केले. साडेबारा टक्के परताव्याचा विषयही मार्गी लागला.

एकनाथ पवार म्हणाले की, शास्तीकर माफी हा पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. २००८ पासून शास्तीकराचे बांडगुळ राष्ट्रवादी काँग्रेसने घातले होते. ते उठवण्याचे काम आमदार लांडगे यांनी केले होते. या प्रश्नावर आंदोलन करण्यास आम्ही सुरूवात केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस पक्षाचे सरचिटणीस होते. ते आंदोलनाला शहरात आले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार लांडगे यांच्या माध्यमातून मोठं ‘गिफ्ट’ पिंपरी-चिंचवडकरांना मिळाले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांची केले, तर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी आभार मानले.

भाजपा परिवाराच्या वतीने केलेला हा सन्मान जबाबदारी वाढवणारा आहे. शहरातील प्रश्न मार्गी लागत आहेत, हे इथल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रिक मेहनतीचे फलित आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मुद्यांवरच शहरातील महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, प्रश्न मार्गी भाजपामुळे लागले आहेत. ही बाब पिंपरी-चिंचवडकर कदापि विसरणार नाहीत.

  • महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button