breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

RagawaVideo: पुण्यात पुन्हा रानगवा; पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर दर्शन

१३ दिवसांपूर्वीच ९ डिसेंबरला कोथरूड परिसरात आलेल्या गव्याला रेस्क्यू करताना उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पुण्यात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन झालं आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे.

पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला पकडण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. दरम्यान गेल्यावेळी गव्याला पकडताना झालेल्या चुका आणि बघ्यांची गर्दी टाळण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर आहे.

कोथरूडमध्ये आलेल्या गव्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त केली गेली होती. त्यानंतर आज पुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी तारांबळ उडाली आहे. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

पाहाः Viralvideo: पुण्यातील रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू पहा मृत्यूपूर्वीच्या धावपळीचा व्हिडिओ Rangawa dies

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button