TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे

PuneNews : बावधन येथील रानगवा पुन्हा जंगलात परतला

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे पाषाण तलावासमोर आलेला रानगवा पुन्हा जंगलात परतला आहे. यापूर्वीच्या कोथरूडमध्ये सापडलेल्या रानगव्याच्या मृत्यूमुळे यावेळेस वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून त्याला काही इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. सुमारे 8 ते 10 तास पाहारा देऊन त्याला पुन्हा जंगलात माघारी पाठविण्यात वन विभागाला यश आले आहे. दरम्यान एनडीए आणि एचईएमआरएलचे संरक्षित वनक्षेत्र रानगव्यांचे कॉरीडॉरच आहे. त्यामुळे या परिसरात शेकडो गवे पाहीले जातात अशी माहिती वन विभागासह स्थानिक नागरिकांनी दिली. 

पाषाण तलावासमोरील शिवप्रसाद हॉटेलशेजारील एचईएमआरएलच्या जंगलातून तो रानगवा आला होता. अंदाजे 10 वर्षांचा धष्टपुष्ठ रानगवा, त्याचे वजन 800 ते 1000 किलो इतके असावे अशी माहिती वन विभागाकडून प्रसारमाध्यमातून  देण्यात आली.

वाचाः RagawaVideo: पुण्यात पुन्हा रानगवा; पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर दर्शन

पुण्याचे मुख्य वनसंरक्षक राहूल पाटील म्हणाले, पाषाण तलावासमोरील एचईएमआरएलच्या संरक्षित भिंतीच्या पलीकडील जंगलात गव्यांचं कॉरिडॉर आहे. पश्चिम घाटाच्या डोंगंररांगाचा हा भाग असल्यामुळे याठिकाणी कोल्हापुरातून आलेल्या रानगव्यांचे वास्तव्य असते. पावसामुळे संरक्षक भिंत तुटल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामधून रानगवे पुणे बंगलोर महामार्गालगतच्या वनक्षेत्रात येत आहेत. परंतु रानगवा मुळात अहिंसक, लाजाळू आणि भित्रा असल्यामुळे त्याचा कुठलाही उपद्रव नाही. परंतु नागरीवस्तीमध्ये येऊ नये यासाठी त्याला बेशुद्ध न करता पुन्हा जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात माघारी पाठवण्याचा प्रयत्न आम्ही केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button