TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

कात्रज भागात महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे: कात्रज परिसरात पादचारी महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ही कात्रजमधील सुखसागरनगर परिसरातून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी सुखसागरनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button