breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘वारसास्थळ दत्तक योजना मागे घ्या’; खासदार सुप्रिया सुळे यांची सरकारवर टीका

पुणे : “इतिहासाचे जतन करण्यासाठी सरकारकडे वेळ आणि पैसा नसावा यासारखे दुर्दैव नाही,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. ऐतिहासिक वारसास्थळे भाडेतत्वावर देण्याचा हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारच्या वारसास्थळ दत्तक योजनेअंतर्गत पुण्यातील शनिवारवाड्यासह, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी आदी स्थळे भाडेतत्वावर देण्यात येणार आहेत. त्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत ट्विट केले आहे.

हेही वाचा –  अपघातग्रस्त पैलवान विजय डोईफोडे याला आमदार महेश लांडगेंची ‘साथ’

देशातील प्राचीन आणि ऐतिहासिक वारसास्थळे खासगी संस्था आणि कंपन्यांना दत्तक देण्याच्या गोंडस नावाखाली केंद्र सरकारने ही स्थळे भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला आहे.

सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरू केला. ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. आम्ही याचा निषेध करत असून, सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button