# War Against Coroana : पुणे परिसरातील 28 परिसर ‘सील’; कोरोना बाधितांची संख्या वाढली!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/15-4.jpg)
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी नव्याने मनाई आदेश काढून १६ पोलिस ठाण्यार्तंगत असलेले २८ परिसर ‘सील’ करण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘करोना’बाधितांची संख्या वाढत असल्याने हे परिसर ‘सील’ करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी नवीन २२ परिसर ‘सील’ करण्याची सूचना केली होती. पोलिसांनी त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी करून २८ परिसर ‘सील’ केले आहेत. पोलिस सहआयुक्तांनी यापूर्वी ‘सील’केलेल्या परिसर यापुढे ३ मेपर्यंत ‘सील’ राहतील, असे आदेश काढले आहेत. खडक, बंडगार्डन, सिंहगडरोड, दत्तवाडी, कोथरूड, विश्रांतवाडी, खडकी, चंदननगर, येरवडा, हडपसर या पोलिस ठाण्यांच्या अखत्यारित नवीन भाग ‘सील’ केले आहेत. या भागातील दुकाने सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेतच उघडी राहणार आहेत. तर, या परिसरातील ‘एटीएम’द्वारे बँकाचे व्यवहार होणार आहेत.