‘मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी गावागावात तरुण – तरुणीचे गस्त पथक तयार व्हावे’; डॉ. निलम गोऱ्हे

पुणे : महिला व मुलीवरील अत्याचार रोखण्यासाठी गावागावात ज्युडो कराटे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणी व उत्तम वर्तवणुक असणाऱ्या तरुणांचे गस्त पथक तयार व्हावे. या पथकामुळे मुली व महिला मध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. असे मत शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
डॉ गोऱ्हे यांनी वाघोलीतील काही सार्वजनिक गणपती मंडळांना भेटी दिल्या. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला यांच्याशी घरी जावून संवाद साधला. याप्रसंगी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी शिरुर लोकसभा संपर्क प्रमुख सारिका पवार, जिल्हा प्रमुख मनिषा परांदे सारिका घाटे, कुंदा सातव, विनिता चौधरी, मनीषा साळुंके आदी उपस्थित होते. डॉ गोऱ्हे म्हणाल्या महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना न्यायालय शिक्षा देते. मात्र ते माध्यमात येत नाही. पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे. गस्त पथक तयार झाले पाहिजे. तरच अत्याचार थांबतील.
हेही वाचा – संकेत बानकुळेंच्या बिलमध्ये बीफ कटलेटचा उल्लेख; संजय राऊतांचा मोठा दावा
त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी अर्चना मोहिते, पूजा पात्रे, अर्चना मदने, कविता काळे यांच्याशी घरी जावून संवाद साधला. तुम्हाला योजनेची माहिती कशी मिळाली, अर्ज कसा केला. पैसे मिळाले का ? पैशाचा वापर कशासाठी केला ?
अजून सरकार कडून काय अपेक्षा आहेत ? असे प्रश्न विचारले. महिलांनी मुलांच्या शाळेसाठी खर्च केल्याचे महिलांनी सांगितले. या पैशातून महिलांनी बचत गट करावा. जेणे करून तुम्हाला एकदम पैसे वापरण्यास मिळतील. असा सल्लाही त्यांनी महिलांना दिला. वाघेश्वर तरुण मंडळाला व तेजस्वीनी संस्थेला त्यांनी भेट दिली. वाघोली वाहतूक कोंडी बाबत लोणीकंद पोलिसांशी संवाद साधला.
डॉ निलम गोऱ्हे यांनी मांडलेले अन्य मुद्दे –
- शहरात जसे चौकात सिग्नल्स असतात तसे ग्रामीण भागातही चौकात सिग्नल्स बसवावेत असे निर्देश परिवहनला दिले.
- वाघोली प्रश्नाबाबत मुख्यमंत्री संयुक्त बैठक घेवून नक्कीच कार्यवाही करतील.
- प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार जागेसाठी शिवसेना इच्छुक
- महिलांना अडथळे आणण्याची आज ही समाजात मानसिकता.
- हिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. हा घरचा आहेर नाही. मुळात ही राजकीय बाब नाही. तिला सन्मान मिळत नाही.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतरही सुरू राहणार.
- चांगल्या प्रकारे आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील