एसटी बस प्रवासातही “यूपीआय’ सुपरहिट

पुणे : एसटी बस प्रवासात सुट्या पैशांसाठी वाहक आणि प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होत आले आहेत. यावर पर्याय म्हणून राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) “यूपीआय पेमेंट’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: पुणे विभागात तिकिटासाठी प्रवासी आॅनलाइन पेमेंट पर्याय स्वीकारत आहेत.
एसटी महामंडळाने १४.९५ टक्के तिकीट दरात वाढ केल्याने बहुतांश तिकीट २१, २५, ३५ अशा प्रकारचे झाले आहेत. त्यामुळे सुट्या पैशांवरून वाद वाढले आहेत. त्यावर तोडगा म्हणून महामंडळाने “यूपीआय’ पेमेंटचे पर्याय दिला आहे. वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशिन (ईटीआयएम) दिली आहे. या मशीनच्या माध्यमातून “यूपीआय पेमेंट’द्वारे तिकीट काढता येत आहे. त्यामुळे सुट्या पैशांचा वाद टाळण्यास मदत होत आहे.
हेही वाचा – जीबीएसचा धोका टाळण्यासाठी पाणी उकळून,अन्न पूर्ण शिजवून खाण्याचा सल्ला
पुणे विभागात एकूण चौदा आगारांचा समावेश आहे. विभागात एकूण जवळपास १ हजार ८०० मशीन आहेत. ज्याला “यूपीआय पेमेंट’ करायचे असते, त्यांनी वाहकाला तसे सांगायचे. त्यानुसार मशिनमध्ये “यूपीआय’ सिलेक्ट करून तिकीट काढतात. त्यानंतर प्रवाशाला भिम अॅप, पे-टीएम, फोन-पे, गुगल-पेद्वारे पैसे देता येतात. याचा प्रवाशांना फायदा होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पुणे विभागात एक हजार ८०० यूपीआय मशीन आहेत. या सर्व मशीनमध्ये यूपीआयद्वारे तिकीट काढण्याची सुविधा आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहक वाद न घालता वाहकांनी यूपीआयद्वारे तिकीट काढावे.
– प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग