Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
पुण्यातील दोन गर्भवतींना ‘झिका’ची लागण; रुग्णसंख्या अठरा
गर्भातील बाळाला ‘झिका’चा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट
पुणे : शहरातील दोन गर्भवतींना ‘झिका’ची लागण झाल्याचे आढळून आले असून, त्यामुळे ‘झिका’च्या रुग्णांची संख्या आता 18 वर गेली आहे.
हेही वाचा – भामा आसखेड धरणात फक्त 17.51% पाणीसाठा!
एक महिला 22 आठवड्यांची, तर दुसरी महिला 18 आठवड्यांची गर्भवती आहे. दोघींचे अॅनॉमली स्कॅन झाले आहे. त्यासंबंधीचे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. त्यामुळे गर्भातील बाळाला ‘झिका’चा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील 18 रुग्णांमध्ये 10 गर्भवती महिलांचा समावेश आहे.