भामा आसखेड धरणात फक्त 17.51% पाणीसाठा!

पुणे : यावर्षी जून महिन्यापासून दमदार पाऊस झाला नसल्यामुळे भामा आसखेड धरणात फक्त 17.78% पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाण्याच्या पातळीने तळ गाठल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. गतवर्षी जुलै महिन्यात सुमारे 32.80% पाणीसाठा होता, भामा आसखेड धरण सुमारे 8.14 टीएमसीचे असून पाणी साठवण्यात तळ गाठल्याने धरणाच्या पश्चिम पट्ट्यातील नागरिकांना दुष्काळजन्य परिस्थितीस तोंड द्यावे लागेल, अशी भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा – प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात; पुणे पोलीस करणार कारवाई
खेड, शिरूर, दौंड तालुक्यांसह पुणे, पिंपरी चिंचवड आणि चाकण औद्योगिक वसाहत यांना वरदान असलेले हे धरण आहे. शेती आणि औद्योगिक वसाहती सोडलेल्या पाण्यामुळे तसेच नियोजनाचा अभाव यामुळे गतवर्षाच्या तुलनेत निम्मा साठाही शिल्लक राहिला नाही. थोड्या अधिक प्रमाणात वळवाच्या पावसाने खेड तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे शेतीची पेरणी झाली, परंतु भात पिकाची लागवड करता येऊ शकेल, असा पाऊस झाला नसल्याने भात पिकाची ही लागवड थांबली.