breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात; पुणे पोलीस करणार कारवाई

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर  यांची नियुक्ती वादात सापडली असून पुण्यात कार्यरत असताना खासगी गाडीवर त्यांनी सरकारी लाल दिवा लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. आधीच बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे युपीएससी परीक्षेतून अधिकारी झाल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आरोप होत असून त्यातच, आता पुण्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी   असताना त्यांनी विनापरवाना स्वत:च्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला, तसेच कारवर महाराष्ट्र शासन ही पाटीही लावली होती. त्यामुळे पुणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करणार आहेत.

हेही वाचा –  हॉटेल, रेस्टॉरंटचालकांची पीएमआरडीएत धाव

पूजा खेडकर यांची युपीएससी परीक्षेतून निवड झाली असून सध्या त्या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती.  पूजा खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कार वर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड सुद्धा आकारण्यात आला आहे.पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्याबद्दल पुणे  पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button