Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल
![Traffic changes in the backdrop of the Vijay Stambh salute ceremony](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Pune-5-780x470.jpg)
पुणे | हवेली तालुक्यातील मोजे पेरणे येथे 1 जानेवारी 2025 रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनामुळे होणारी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत.
मुंबईकडून चाकणमार्गे येणाऱ्या अनुयायींची वाहने जुना मुंबई-पुणे हायवे रोडवरुन वडगाव मावळ, देहूरोड, निगडी, चऱ्होली, आळंदी मरकळ मार्गे (पिंपरी चिंचवड आयुक्तालय), तुळापुर, लोणीकंद (पुणे शहर आयुक्तालय) मार्गे पेरणे विजयस्तंभ याप्रमाणे वळविण्यात येणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.