जिल्ह्यातील पर्यटनस्थळे एकाच नकाशावर यावीत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-12-780x470.jpg)
पुणे : शहरासह सर्व तालुक्यांमधील ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक महत्त्वाची ठिकाणे, गड किल्ले, स्मारके पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजुरीच्या बैठकीत पवार बोलत होते. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी पवार म्हणाले की, जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा.
यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीची बचत होऊन तो अन्य विकासकामांसाठी उपयोगात आणता येईल, शासकीय इमारती, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींसाठी सौर छत योजना प्राधान्याने राबविण्यात यावी.
पुणे जिल्ह्यात 303 प्राथमिक शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी “माझी शाळा आदर्श शाळा’, 108 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून हे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवावेत, असे निर्देश पवार यांनी दिले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा