GBS आजाराबाबत तीन मोठे निर्णय, मुरलीधर मोहळ यांचं ट्विट; प्रशासन लागले कामाला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/pune-57-1-780x470.jpg)
पुणे : पुण्यात गीयन बारे सिंड्रोम या विचित्र आजाराने घबराट पसरली आहे. या आजाराची पुण्यातील वाढती संख्या पाहाता प्रशासन कामाला लागले आहे. पुण्यात GBS ची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. ‘गीयन बारे सिंड्रोम’ अर्थात जीबीएस या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता काही महत्त्वाचे निर्णय महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून घेतले आहेत असे ट्वीट पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी केले आहे.
‘गीयन बापे सिंड्रोम’ अर्थात जीबीएस या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी ट्वीट केले आहे. आपण पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करुन काही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे खासदार मुरलीधर यांनी केले आहे.
मुरलीधर मोहळ यांचे ट्वीट नेमके काय ?
-पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार
-खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘शहरी गरीब’ योजनेचा लाभ देऊन पुणे महापालिकेच्या वतीने २ लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणार आहे.
– कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे.
हेही वाचा – सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, धर्म म्हणजे….”
पुण्यात GBS ची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. या संदर्भातील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. एका 40 वर्षे वय असलेल्या या व्यक्तीस पुण्यात GBS ची लागण झाली होती. त्यानंतर तो रुग्ण उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने या रुग्णास खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
सुरुवातीला या रुग्णाला ICU मध्ये ठेवण्यात आले होते मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला जनरल रूममध्ये हलवण्यात आले. मात्र काल अचानकपणे त्याला श्वास घेण्यात अडचण येत असल्याने पुन्हा एकदा ICU मध्ये हलविण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास पुण्यात GBS ची लागण झाली होती याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
य़ा रुग्णाचा व्हीसेरा देखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या रुग्णाचा मृत्यूचे नेमके कारण काय ? याबाबतीत प्राथमिक माहिती शवविच्छेदन आणि व्हीसेरा तपासणी अहवालानंतरच प्राप्त होईल असे सोलापूर महानगर पालिकेने म्हटले आहे. मात्र GBS बाबतीत कोणीही अफ़वा पसरवू नये, तसेच लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.