रहाटणी खून प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल
![Baap-leka murdered by a group of 5 to 6 people in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/murder1.jpg)
पुणे | रहाटणी येथे रविवारी (दि. 27) सायंकाळी कोयत्याने वार करून एका तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल मोकाशी (रा. रहाटणी), साहिल कुंभार, प्रसाद ठोंबरे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. निशांत वचिष्ठ सुरवसे (वय 21) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अनिल केरबा गायकवाड (वय 35, रा. गणराज कॉलनी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निशांत याने आरोपी मोकाशी याचा मावस भाऊ आरोपी ठोंबरे याला मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी आपसांत संगनमत करून रविवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास निशांत याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.