पुण्यासह राज्यात वातावरणात गारवा, पुढील 3-4 दिवसत येणार थंडीची लाट
![The weather in the state including Pune is cold, cold wave will come in next 3-4 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/cold.jpg)
पिंपरी चिंचवड | मागील काही दिवसात राज्यात पाऊस झाला होता त्यानंतर आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात होत आहे. दोन दिवसांपासून पुण्यासह राज्यात वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे.या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच आता पुढील 3-4 दिवस थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.पुढील ४ दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश भागातील तापमान २-३ डिग्री सेल्सियसने घसरणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यासह पुढील ४-५ दिवस भारतातील वायव्य आणि मध्य भारत तसेच गुजरातच्या बहुतेक भागांमध्ये देखील कडाक्याची थंडी पडणार आहे. या भागातील तापमानात २-४ अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवस राज्यासह देशात नागरिक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेता येणार आहे.पुढील काळात उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागातील तापमानात विशेष बदल होणार आहेत. त्यानंतर तापमानात हळू हळू घट होणारआहे. महाराष्ट्रातील उत्तर – मध्य व संलग्न मराठवाडा तसेच विदर्भात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवणार आहे.