Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे-मुंबई प्रवास आता ‘सुपर फास्ट’ : मुंबई-बंगळुरू मार्गावरील प्रवाशांचा दीड तासांचा वेळ वाचणार!

पॉझिटीव्ह बातमी : अटल सेतूला जोडल्या जाणाऱ्या महामार्गामुळे फायदा

पुणे | मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून पुण्याला जाणे अधिक सोपे आणि वेगाने होणार आहे. मुंबईहून पुण्याला जाताना आता ९० मिनिटे वाचणार आहे. आता मुंबई पुणे प्रवास अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे. आता अटल सेतूला जोडला जाणारा एक महामार्ग तयार करण्यात येणार आहे. हा महामार्ग थेट सातारा आणि सांगलीला जोडला जाणार आहे.

अटल सेतूला जोडल्या जाणाऱ्या महामार्गामुळे मुंबई पुणे प्रवास आता दीड तासाने कमी होणार आहे. सध्या मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. याच प्रवासाचा कालावधी दीड ते २ तासांनी कमी होणार आहे. सोलापूर आणि साताऱ्याला जोडल्या जाणाऱ्या एक्सप्रेस वेमुळे हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

हेही वाचा    –      अजित गव्हाणे यांना नेहरूनगरमधून सर्वाधिक ‘लीड’ 

आता मुंबई पुणे हा प्रवास फक्त दोन तासातच होणार आहे. सध्या २ ते ४ तासात आपण पुण्याला जातो. त्यात अनेकदा वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच हा नवीन एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. आठ लेन असलेल्या या महामार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासाची ७५ ते ९० मिनिटे कमी होणार आहे.

एक्सप्रेस वे महत्त्वाच्या मार्गांना जोडणार..

सदर एक्सप्रेस वे महत्त्वाच्या मार्गांना जोडला जाणार आहे. यात अटल सेतू जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, पुणे, सोलापूर, साताऱ्याचा समावेश आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. मुंबई पुणे कोरिडॉरमधील वाढत्या रहदारीमुळे नागरिकांना वाहतूक कोडींचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने हा नवीन एक्सप्रेस वे बांधण्यात येणार आहे. नवीन एक्सप्रेस वे, अटल सेतू थेट सोलापूर आणि साताऱ्याला जोडणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button