विद्यार्थी खेळाडूंचे प्रस्ताव राज्य बोर्डाने मागवले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-7-1-780x470.jpg)
पुणे : राज्य बोर्डाच्या यंदाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेतील खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांकडून १५ एप्रिलपर्यंत मागविण्यात येणार आहेत. तसेच एन.सी.सी, स्काऊट गाइडचे प्रस्ताव देखील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी विभागीय मंडळांकडे १५ एप्रिलपर्यंत पाठवावेत, अशी सूचना राज्य मंडळाकडून करण्यात आली आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थी आणि एन.सी.सी, स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. या गुणांसाठी राज्य मंडळाकडून संबंधित क्रीडा अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात येतात.
हेही वाचा : अनधिकृत आरओ प्लांट्स बंद करण्याचे महापालिकेचे आदेश!
दहावी व बारावीच्या परीक्षा यंदापासून परीक्षा लवकर होणार असल्याने सवलतीच्या गुणांसाठीचे प्रस्ताव दि. १५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात यावेत, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.