जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू होणार, सुरवातीला 200 बेड कार्यान्वित करण्याचा निर्णय
![The Jumbo Covid Center will be reopened, with an initial decision to operate 200 beds](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/maharashtra-times-1.jpg)
पुणे | शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हे कोविड सेंटर येत्या दोन दिवसात सुरु होणार असून सुरुवातीला 200 बेड कार्यान्वित करण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिका आरोग्य प्रमुख आशिष भरती यांनी दिली.कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी शिवाजीनगर येथील सीओईपीच्या मैदानावर जम्बो कोवीड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरचा कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत चांगलाच फायदा झाला. कोरोनाच्या दुसर्या लाटेसाठी महापालिकेने 23 मार्च 2021 पासून जम्बो पुन्हा सुरू केले. शहरात 18 एप्रील पासून करोनाची साथ उतरणीला लागल्याने पालिकेने 22 जून पासून जम्बो बंद करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी 22 जूनला 25 रूग्ण उपचार घेत असल्याने हे सेंटर 30 जूनला बंद करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
जम्बो कोविड सेंटरची बेडची क्षमता सुमारे 800 असून, त्यात तब्बल 700 ऑक्सिजन बेड आहेत. मात्र सध्या 200 बेड कार्यान्वित करण्यात येणार असून यामध्ये यामध्ये 120 ऑक्सीजन बेट तर 20 व्हेंटिलेटर बेड असणार आहेत असे भारती यांनी सांगितले.