एसव्हीपी फिल्म प्रोडक्शनची दोन दिवसीय देवदर्शन सहल उत्साहात
देवदर्शनातून आत्मिक आनंद मिळाल्याच्या भाविकांच्या भावना
![SVP Film Production's two-day Devdarshan trip in excitement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/SVP-Devdarshan-Tour-780x470.jpg)
पुणेः वडगांव मावळ येथील एक्झर्बिया अबोड रहिवाशी संकुलातील रहिवाशांना देवदर्शन घडावे, तसेच पर्यटनासोबत अध्यात्माची गोडी लागावी, या हेतूने येथील एसव्हीपी फिल्म प्रोडक्शन व बेलपाडे टुर्स प्रा. लि. च्यावतीने 29 ते 31 जानेवारीदरम्यान दोन दिवसीय देवदर्शन स्पेशल टुरचे आयोजन करण्यात आले होते. या टुर्सच्या माध्यमातून पर्यटनासाह आत्मिक आनंद मिळाल्याच्या भावना या सहलीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी व्यक्त केल्या. यामध्ये चिमुकल्यांसह वयोवृद्ध, महिला-पुरुष यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
एसव्हीपी फिल्म प्रोडक्शनच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून देवदर्शन स्पेशल टुर्सचे आयोजन केल्याचे आयोजक के. प्रकाश, व्हि. भोरे, जी अनंत, डी. ठोसर, एस. पंडित, विकास भोईटे, सदानंद शिर्के, शिव बेलपाडे यांनी सांगितले. तर देवदर्शन टुर्स प्रवासादरम्यान विमल क्षिरसागर यांनी सुश्राव्य भजन गायन करत भाविकांची करमणूक केली.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, रावेतच्या विद्यार्थ्यांचा मॅप्रो कंपनीला औद्योगिक भेट
एक्झर्बिया अबोड येथून प्रथमच काढण्यात आलेली ही देवदर्शन सहल, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर, गोंदवलेकर महाराज, शिखर सिंगणापूर, जेजूरी अशा सहा ठिकाणी नेण्यात आली. यावेळी देवदर्शनासह पर्यटनाचादेखील आनंद सहभागी भावीकांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
आगामी काळात देवदर्शन टुर्स सोबत आम्ही पर्यटन, गड किल्ल्यांची भ्रमंतीदेखील घडवून आणणार आहोत. जास्तीत चांगले उपक्रम राबविण्याचा आमचा मानस असून, एसव्हीपी फिल्म प्रोडक्शनच्या वतीने आम्ही लोकांचे संघटन वाढविण्यावर भर देणार आहोत. तसेच सामाजिक देखणे उपक्रम राबवून एसव्हीपीच्या नावलौकिकात भर घालणार आहोत. आमच्या या लोकहिताच्या तसेच लहानग्यांच्या भावविश्वाला पंख देण्याच्या चळवळीत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे. व आमचे संघटन मजबूत करावे.
के. प्रकाश, मुख्य आयोजक,
एसव्हीपी फिल्म प्रोडक्शन, एक्झर्बिया अबोड, जांभुळगाव, वडगांव मावळ, पुणे