breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

सुप्रिया सुळेंनी घेतली आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर यांची भेट

पुणे – आसाम मिझोराम राज्यांच्या सीमेवर झालेल्या गोळीबारात आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर हे २२ जुलै रोजी गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्करी विमानाने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून सध्या उपचार सुरू आहेत. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी वैभव यांच्या पत्नी अनुजा, वडील चंद्रकांत निंबाळकर, आई संगिताताई निंबाळकर, त्यांची बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकर, मेहुणे सुकिर्त गुमास्ते आणि शीतलताई गोरे आदी उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या, ‘निंबाळकर कुटुंबीय प्रेरणादायी आहे. या सर्वांना भेटून अतिशय छान वाटले. वैभव हे लवकर बरे व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करते.’ निंबाळकर यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी आसाम राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल यांनी सन्मानित केले. आसामच्या पोलीस महासंचालकांकडूनही त्यांना सुवर्णपदक मिळाले आहे.

वैभव निंबाळकर यांची वयाच्या २२व्या वर्षी युपीएसएसी उत्तीर्ण झालेले व भारतातील सर्वात तरुण आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी, अशी ओळख आहे. ते सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील असून त्यांचे शालेय शिक्षण बारामती येथे झाले आहे. एस.डी.पी.ओ, बोकाखाट म्हणून काम करताना आसाममधील डीजीपींकडून उत्कृष्ट नेतृत्व आणि आदर्श व्यावसायिक क्षमतेबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र मिळाले आहे. काझिरंगा नॅशनल पार्क येथील एकशिंगी गेंड्यांच्या शिकारी व शिंगांची तस्करी करणाऱ्या आरोपींना त्यांनी अटक केली होते. तसेच ‘कम्युनिटी पोलिसिंग’चे ते समर्थक असून जादूटोणा, अंमली पदार्थ, व्यसनमुक्ती, सायबर क्राइम इत्यादी सामाजिक गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर वैभव निंबाळकर यांनी म्हटले की, ‘खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माझ्यासमवेत कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. माझ्या आरोग्याची आपुलकीने विचारपूस केली. त्याबद्दल माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी आनंदाची व समाधानाची बाब आहे.’

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button