ताज्या घडामोडीपुणे

भरधाव कंटेनर बस स्टॉपमध्ये घुसल्याने भीषण अपघात; वडगाव मावळ येथील घटना

भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू; तर तीन विद्यार्थी जखमी

वडगाव मावळः भरधाव कंटेनर बस स्टॉपमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात एक महिला जागीच ठार तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर एक दुचाकीस्वार सुदैवानं बचावला हा अपघात बुधवारी (दि.18) सकाळी 8:45 वा. मुंबई-पुणे महामार्ग कुडे वाडा वडगाव नगरपंचायत ता.मावळ हद्दीत घडला

लता रणजित जाधव (वय 41 रा. कुडे वाडा वडगाव मावळ) अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.असून संदीप झलाटे (वय ४० रा. दिग्विजय कॉलनी वडगाव मावळ) सृष्टी भाटेकर (वय ११ रा.केशवनगर वडगाव मावळ),मैत्रीय भवार, मृणाल भवार वय १४ दोघेही रा.वडगाव मावळ जि. पुणे हे विद्यार्थी जखमी झाले आहेत

वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार कुडेवाडा येथील बस स्टॉपवर नेहमीप्रमाणे महिला, विद्यार्थी व नागरिक थांबले होते. सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एम एच 46 बी एफ 9157 कंटेनर जात असतानाच समोर शालेय बस वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर बस स्टॉप मध्ये घुसला यात महिला लता जाधव हिचा जागीच मृत्यू झाला. शाळेला जाणारे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यात दुचाकीस्वार बचावला.

घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार डोईजड होते. पोलिसांनी कंटेनर बाजूला केला. बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

या मृत महिलेच्या पतीचे निधन कोरोनामध्ये झाले. दोन मुली व मुलगा असे कुटुंब असून महिला उदरनिर्वाहासाठी कामाला जात असताना,अपघात झाल्याने वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button