ताज्या घडामोडीपुणे

एसीच्या पाण्याचा स्मार्ट वापर कुठे होतो ?

एसीच्या पाण्याचं हा वापर जो आपल्या पर्यावरणाचं भलं करेल!

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजे एसीचा मोसम! सतत घाम, उकाडा आणि तापमान वाढल्यानंतर एसीशिवाय राहणं जवळपास अशक्यच. पण एसीचा वापर करताना तुम्ही कधी त्यातून बाहेर पडणारं पाणी पाहिलं आहे का? रोज एसीमधून अनेक लिटर पाणी बाहेर पडतं आणि आपण ते सर्रास फेकून देतो. पण खरंतर हे पाणी उपयोगी पडू शकतं. एसीचं पाणी पिण्यासाठी योग्य नसतं, कारण त्यात धूळ, बॅक्टेरिया असण्याची शक्यता असते. पण घरातली काही कामं अशी आहेत जिथं हेच पाणी वापरून तुम्ही चांगली बचत करू शकता!

हेही वाचा –  गाईंना गुंगीचे औषध देऊन तस्करी करण्याचा प्रयत्न फसला; चोरट्यांवर तात्काळ कारवाई करा, पंकजा मुंडेंचा आदेश

एसीच्या पाण्याचा स्मार्ट वापर कुठे होतो ?
1. गाडी धुण्यासाठी : गाडी किंवा दुचाकी धुण्यासाठी तुम्ही एसीचं साचलेलं पाणी वापरू शकता. यामुळे स्वच्छतेसाठी लागणारं नळाचं पाणी वाचेल.

2. झाडांना पाणी घालण्यासाठी : काही प्रकारच्या सजावटीच्या झाडांना (जसे की कॅक्टस) हे पाणी देता येईल. मात्र, थोडक्याच झाडांवर आधी चाचणी करून मग नियमित वापर करा.

3. घर स्वच्छ करण्यासाठी : घराचा फरशी पुसताना किंवा बाथरूम स्वच्छ करताना हे पाणी वापरा. थोडंसं डिटर्जंट टाकल्यावर स्वच्छतेसाठी अगदी परफेक्ट!

4. कूलर आणि बॅटरीसाठी : एसीचं पाणी डिस्टिल्ड स्वरूपाचं असतं, त्यामुळे इन्व्हर्टरच्या बॅटरी किंवा कूलरमध्येही तुम्ही हे पाणी सहज वापरू शकता.

एसीमधून रोज सुमारे 1-2 लिटर पाणी बाहेर पडतं. जर तुम्ही हे पाणी फेकण्याऐवजी घरातल्या कामांसाठी वापरलंत, तर उन्हाळ्यात किमान 50-60 लिटर पाण्याची बचत होऊ शकते! ही बचत तुमच्याच नव्हे तर पृथ्वीच्या भविष्यासाठीही महत्त्वाची आहे. तर मग, एसीच्या पाण्याला आता वाया जाऊ देऊ नका थोडं विचार बदला आणि पर्यावरणासाठी पाऊल उचला!

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button