Pune Fergusson College : पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील सावरकरांची खोली आता सर्वांसाठी खुली!
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

पुणे | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालय (Pune Fergusson College) वसतिगृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सावरकरप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांसाठी ऐतिहासिक स्मृतीस्थळ दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सन १९०२ ते १९०५ या कालावधीत सावरकर हे वसतिगृहातील खोली क्रमांक १७ मध्ये वास्तव्यास होते. (Pune Fergusson College) त्यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेली ही खोली आजही विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान मानली जाते. तसेच सावरकरांना मिळालेल्या डी.लिट. पदवीचे गाऊनही येथे जतन करून ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : जावलीतील बहुचर्चीत हुमगाव- बावधन रस्त्याची दर्जोन्नती
गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत सदर खोली नागरिकांसाठी (Pune Fergusson College) दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. सकाळी ९.०० वाजता डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद रावत यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल अशी माहिती वसतिगृह प्रमुख प्रा. अंकित रावल यांनी दिली आहे.
‘गुण-सुमनें मी वेचियली या भावें’ सांस्कृतिक कार्यक्रम
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्य व जीवनकार्यावर आधारित ‘गुण-सुमनें मी वेचियली या भावें’ हा सांस्कृतिक कार्यक्रम २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफिथिएटरमध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सावरकरांच्या साहित्यसंपदेचा, काव्यलेखनाचा तसेच (Pune Fergusson College) त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचा वेध घेण्यात येणार आहे. युगंधरा पाटील आणि सहकारी हे सादरीकरण करणार असून विद्यार्थ्यांना सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा बहुआयामी परिचय करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.




