शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत रिंग रोडची मोजणी होऊ देणार नाही : बाळा भेगडे
![Ring Road will not be counted till farmers' issues are resolved: Bala Bhegade](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Bala-Bhegade.jpg)
पुणे – महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम चालू आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांमध्ये रिंगरोड बाबत तीव्र नाराजी आहे. प्रस्तावित रिंगरोड बाबत राज्यसरकार व अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून शेतकऱ्यांच्या समस्यांचे समोरासमोर निरसन करावे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत रिंगरोडची मोजणी होवू देणार नसल्याचा इशारा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिला.
तळेगाव दाभाडे येथे सोमवार (दि 26) मावळ तालुक्यातील प्रस्तावित रिंगरोड बाधित शेतकऱ्यांची माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पाचाणे, चांदखेड, परंदवडी, बेबडओहोळ, उर्से, वडगाव, आंबी, सुदवडी, सुदुंबरे, इंदोरी,वराळे या गावातील बाधित शेतकऱ्यांसह किसान मोर्चाचे जेष्ठ नेते शंकर शेलार, भास्कर म्हाळसकर, ॲड. दिलीप ढमाले, प्रशांत ढोरे, किसान मोर्चाचे संतोष दाभाडे, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, नितीन मराठे, शिवाजी पवार,नाना धामणकर, दत्तोबा गाडे, चंद्रचूड महाराज, विश्वनाथ शेलार, राजेंद्र शहा, तानाजी येवले, संदीप येवले, दीपक जाधव, नंदकुमार येवले, प्रसाद पिंगळे,वसंत भिलारे,अरुण वाघमारे, भूषण मुथा आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.