ताज्या घडामोडीपुणे

पीएमपीएमएलच्या वतीने चालक, वाहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस योजना

पिंपरी चिंचवड | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजनेची घोषणा करण्यात आली आहे. परिवहन महामंडळाच्या स्वारगेट मुख्यालयात 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही घोषणा केली.या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महामंडळाच्या 13 आगारांमधील प्रत्येकी एक चालक, एक वाहक, वर्कशॉप विभागातील एक कर्मचारी यांच्यासह सर्व आगारांमधून एक आगार व्यवस्थापक, एक आगार अभियंता यांना तसेच चेकर टीम व विभाग प्रमुख यांना सन्मानपत्र, रोख रकमेचे पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे. या बक्षिसासाठी निवड करताना वर्षभरातील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे.

ध्वजारोहणानंतर 18 चालक सेवकांचा व प्रशासन विभागातील 1 लिपिक अशा 19 सेवकांचा सत्कार करण्यात आला. जब्बार पटेल, छगन शेळके, तात्याबा हगवणे, योगेश जमदाडे, सुनील डोंगरे, विनोद माने, गणेश गर्जे, सच्चिदानंद कदम, सचिन खोपडे, स्वप्नील गाढवे, संतोष जगदाळे, संजय पासंगे, रामदास मेदगे, विकास गागडे, निरंजन ढगे, प्रकाश विघ्ने, संदीप बोंगाणे, राजू भालेराव या चालकांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार व जनता संपर्क अधिकारी सतीश गाटे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button