मॅट्रिमोनी साइटवर ओळख झाल्यानंतर लग्नाच्या आमिषाने बलात्कार
![Accused of raping NCP corporator's son](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/rape_clipart.jpg)
नंतर दुसरी सोबत केले लग्न
पुणे | मॅट्रिमोनी साइटवर लग्नाची रिक्वेस्ट पाठवून नंतर ओळख वाढवत तरुणीची भेट घेत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन तरुणीची फसवणूक करण्यात आली. 28 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर केतन भाऊसाहेब शेळके (रा.पोलीस हौसिंग सोसायटी, नाशिक) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपीने पीडित तरुणीला मॅट्रीमोनी वेबसाइटवर लग्नासाठी रिक्वेस्ट केली. त्यानंतर तिच्याशी ओळख वाढवून फिर्यादीला भेटण्यासाठी तो नाशिक वरून पुण्यात आला. पुण्यात आल्यानंतर त्याने तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून पीडित तरुणीला विद्यापीठाच्या आवारात नेले. तिथे तिच्या कडे शारीरिक संबंधाची मागणी करत जबरदस्तीने तिला शिवाजीनगर परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर नाशिक आणि इतर ठिकाणीही तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत राहिला. आणि एके दिवशी त्याने फिर्यादी तरूणी सोबत लग्न करण्यासाठी नकार दिला.
अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तुझी वाट लावतो. तुला काय करायचे ते कर मी तुझ्याशी लग्न करणार नाही असे म्हणून धमकी दिली आणि दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करून फसवणूक केली.