ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील वाहतूक कोंडी देशभर नाही तर जगभरातील विषय

रस्त्यांचे नियोजन नसल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी नवीन नाही. रस्त्यांचे नियोजन नसल्यामुळे पुणेकरांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. काही किलोमीटर अंतर जाण्यासाठी तासन तास लागत असतो. माध्यमे आणि सामाजिक संस्थांकडून वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु हा प्रश्न सोडवण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी ही देशभर नाही तर जगभरातील विषय होऊ लागला आहे. भारतातील ३ शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातून पुणे पहिल्या क्रमांकावर आहे.

कोलकोता पहिल्या क्रमांकावर
टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स रिपोर्टनुसार, भारतातील ३ शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. 2024 च्या इंडेक्सनुसार कोलकोता भारतातील पहिल्या क्रमांकाचे वाहतूक कोंडी असणारे शहर आहे. कोलकोतामध्ये १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी ३३ मिनिटे लागतात. जगाचा विचार केल्यावर कोलकोता दुसऱ्या क्रमांकाचे वाहतूक कोंडी असणारे शहर आहे. पहिल्या क्रमांकावर कोलंबियामधील बॅरेंक्विला शहर आहे.

पुणे देशात तिसऱ्या क्रमांकावर
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या रिपोर्टनुसार, भारतातील तीन शहरांमध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात पुणे जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकावर तर भारतात तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. भारतची सिलिकॉन व्हॅली असलेले बंगळुरू देशातील दुसऱ्या क्रमांकाचे वाहतूक कोंडी असणारे शहर आहे. बंगळुरुमध्ये 10 किलोमीटर प्रवासासाठी सरासरी 33 मिनिटे लागतात. भारतातून तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील पुणे शहर आहे. पुण्यातही 10 किलोमीटर प्रवासासाठी सरासरी 33 मिनिटे लागतात. 2023 पेक्षा एक मिनिटांनी त्यात सुधारणा झाली आहे. पुण्याचा वाहतूक कोंडीत जगात चौथा क्रमांक आहे.

मुंबई कितव्या क्रमांकावर…
भारतीय शहरांमध्ये हैदराबाद आणि चेन्नई देशात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. मुंबईकरांसाठी दिलासा म्हणजे देशातील टॉप पाच वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरात मुंबई नाही. मुंबईचा क्रमांक सहावा आहे. अहमदाबाद सातव्या क्रमांकावर आहे. नवी दिल्ली दहाव्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर हैदराबाद आणि चेन्नई 18व्या आणि 31व्या क्रमांकावर आहेत. जागतिक स्तरावर मुंबई आणि अहमदाबाद 39व्या आणि 43व्या स्थानावर आहेत.

असा केला डेटा जमा
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2024 साठी डेटा 600 दशलक्षाहून अधिक कनेक्ट केलेल्या उपकरणांमधून गोळा केला गेला. ज्यामध्ये 62 देशांमधील 500 शहरांचा समावेश असलेल्या टॉमटॉम ऍप्लिकेशनचा वापर करून इन-कार नेव्हिगेशन सिस्टम आणि स्मार्टफोनचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button