breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
पुणे : ज्येष्ठ सुलेखनकार आणि छायाचित्रकार कुमार गोखले यांचे निधन
![Pune: Senior calligrapher and photographer Kumar Gokhale passed away](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Kumar-Gokhale-pune.jpeg)
पुणे । प्रतिनिधी
ज्येष्ठ सुलेखनकार आणि छायाचित्रकार कुमार गोखले (६३) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात बंधू, वहिनी, विवाहित पुतण्या असा परिवार आहे.
मूळचे मिरजचे असलेले गोखले रसायनशास्त्राचे पदवीधर होते. त्यांनी चित्रकलेचे आणि छायाचित्रणाचे शिक्षण घेतलेले नव्हते. मात्र उपजत गुण, निरीक्षण आणि स्वत: के लेल्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी सुलेखन, जाहिरात आणि छायाचित्रण क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवला. ‘पुन्हा यादों की बारात’ अशी काही पुस्तके , ‘समाजस्वास्थ्य’, ‘झुंड’ अशी नाटके , ‘लालबाग परळ’, ‘व्हेंटिलेटर’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’, ‘बके ट लिस्ट’ अशा चित्रपटांच्या जाहिरातीतील सुलेखन, छायाचित्रण गोखले यांनी के ले.