Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

पुणे गारठले : हंगामातील निच्चांकी ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद!

पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात शुक्रवारी किमान तापमान घसरले. यात पुण्याचे तापमान ९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याचा प्रभाव सोमवारीही कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यानंतर, पुढील चार ते पाच दिवस किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
या हंगामातील निचांकी तापमान जळगाव येथे १०.३ अंश सेल्सिअस आहे. त्यानंतर, नाशिकचा समावेश आहे. हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम काश्यपी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून दिवसा व रात्री स्वच्छ आकाश आहे. थंड वाऱ्यांमुळे जमिनीचे तापमान रात्री कमी होत आहे.
कमाल तापमानातही सरासरीपेक्षी घट झाली आहे. सोमवारीही थंडीचा प्रभाव कायम राहील. बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. ते पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकून त्याचा कमी दाबाचा पट्टा होण्याची शक्यता आहे. हे पट्टा तामिळनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे राज्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढून किमान, तसेच कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button