Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पु. ल. देशपांडे उद्यानातील कलाग्रामचे लोकार्पण

पुणे :  “पुणे शहरात मेट्रो आली, नदीसुधार प्रकल्प सुरू आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात नुसती भूमिपूजन झाली; पण मोदी सरकार प्रत्यक्षात प्रकल्प साकारत आहे. त्यामुळेच शहराचा चेहरामोहरा बदलत आहे,’ असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे उद्यान येथे विकसित करण्यात आलेल्या कलाग्रामचे लोकार्पण मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, दीपक मिसाळ, धीरज घाटे, करण मिसाळ, श्रीकांत जगताप, किरण ठाकूर यांची उपस्थित होते. वास्तूरचनाकार तीर्था मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा –  बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

“पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे, तशीच ती कलाकारांची ही नगरी आहे. कलाकरांना आपले कलाविष्कार सादर करण्यासाठी विविध व्यासपीठे पुण्यात उपलब्ध करुन दिली आहेत. आता याच पुण्यात कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ असणारे कलाग्राम नक्कीच मोठा आधार ठरणारे आहे,’ असे मोहोळ म्हणाले.

सिंहगड रोडला ५० एकर जागा यामध्ये पहिल्या फेजमध्ये पु. ल. देशपांडे उद्यान झाले, आता कलाग्राम झाले म्हणजे पूर्ण ५० एकर विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे पु. ल. देशपांडे कट्टा विकसित केला जाईल.

ज्यामध्ये पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित कला, साहित्याचे सादरीकरण करण्यात येईल, अशी माहिती आ. मिसाळ यांनी दिली. प्रास्ताविक राजेंद्र भोसले यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

बांबू, दगडांपासून तयार केलेल्या वस्तू, ग्रामीण कलाकृतींच्या प्रात्यक्षिकांसह विविध राज्यांमधील लोककला आणि खाद्यपदार्थांची मेजवानी पुणेकरांना एकाच छताखाली येथे उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button