Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर !

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर असून शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. शिक्षक प्रसारक मंडळी संस्थेचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – ‘..तर मोदी सरकार कोसळेल’; माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा
नरेंद्र मोदी यांच्या पुण्याचा 27 सप्टेंबर च्या दौऱ्याबाबत मुख्य सचिवांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे विभागीय आयुक्तांची बैठक घेतली होती. त्यात दौऱ्यातील कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी गुरुवारी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मोदींच्या दौऱ्याचा नियोजन व चर्चा करण्यात आली.





