breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा’; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन असून, केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर हा मार्ग तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मेट्रो रोड आणि अहमदनगर रोड ट्रॅफिक जाम संदर्भात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे सीईओ रमेश चव्हाण, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ आदी उपस्थित होते. आदी उपस्थित होते.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाला आवश्यक मंजुरीसाठी केंद्र सरकारच्या स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. या मेट्रो मार्गावरील स्थानकांचा अत्याधुनिक सुविधांसह समावेश करण्यात यावा. रामवाडी ते विमानतळापर्यंत मेट्रो मार्गाची सुविधा देण्याचा विचार करा.

हेही वाचा – कोणत्या समलिंगी पुरूषांना मासिक पाळी येते? स्मृती इराणींचं नवं विधान चर्चेत

अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते व पुलांच्या कामाला गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही लवकर करावी. नगररोड परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी. या परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, नगर रस्त्यावरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही करावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या प्रगतीची माहिती दिली. या मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी विचारला जात आहे. त्याला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यावर या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button