पुणे स्टेशनवर प्रवाशांना २४ तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार!
![Passengers will get fresh food for 24 hours at Pune station](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Pune-station-780x470.jpg)
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या जागेत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना आता चोवीस तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार आहे. पुणे विभागात सुरू झालेले हे दुसरे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे कोच रेस्टॉरंट १०० चौरस मीटर क्षेत्रफळावर रेल्वेच्या कोचमध्ये तयार करण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना पार्सल सुविधा देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा – दिल्ली मेट्रोत निब्बा-निब्बीचा खुलेआम रोमान्स, Video व्हायरल
या रेस्टॉरंटमधून रेल्वेला वर्षाला ६० लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’मध्ये लवकरच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑनलाईन पदार्थ बुकींग करण्याची सोय केली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांना ६० किलोमीटर अंतरावरून त्यांना हवा तो पदार्थ ऑर्डर करून ठेवावा लागेल. त्यानंतर रेल्वे गाडी स्थानकावर आल्यानंतर जागेवर तो पदार्थ प्रवाशांना मिळेल अशी सोय केली जाणार आहे.