लक्षवेधी पुढाकार : लहू बालवडकर सोशल फाउंडेशनतर्फे 2500 लसीकरणाचा टप्पा पार!
- कोरोना लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
पुणे | प्रतिनधी
लहु बालवडकर सोशल वेलफेअर यांच्या वतीने अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी लहु गजानन बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत लसीकरण महाअभियान सुरु करण्यात आले होते. या अभियानाने 2500 लसीकरणाचा टप्पा नुकताच पार केला.
जगभर पसरलेल्या या कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी व याचा समूळ नायनाट करण्यासाठी बाळासाहेब देवरास पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिटयूट, PPCR, पुणे वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान, फर्स्ट एड पॉलिक्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने या लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
या लसीकरण मोहिमेत मोलाची साथ देणाऱ्या नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी यांचा लहु गजानन बालवडकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कोरोना महामारी विरोधात लढण्यासाठी या मोफत लसीकरण मोहिमेत बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे येथील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व आपल्या देशाला, आपल्या शहरला, आपल्या परिसराला कोरोना महामारीमुक्त करावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे या वेळी भाजपा सदस्य व लसीकरण मोहिमेचे आयोजक लहु गजानन बालवडकर यांनी आपले मत व्यक्त केले.